Sameer Panditrao
माशेल पंचक्रोशीतील श्री देवकीकृष्ण मैदानावर चिखलाने माखलेले आबालवृद्ध गोविंदा ओळखणेही कठीण झाले होते.
‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’ अशा गजरात नाचत-खेळत होणारा चिखलकाला-गोपाळकाला अविस्मरणीय ठरला.
गजरात नाचत चिखलकाल्याला आबालवृद्धांनी सुरुवात केली आणि काही क्षणात सगळेच गोविंदा लाल मातीच्या चिखलात एकरूप झाले.
उड्या मारत नाचणे, चेंडू फेक, चिखलातील मनोरंजक चक्र, नवरा-नवरी बनवून विवाह करणे असे विविध खेळ यावेळी खेळले गेले.
जमिनीवर बसून दोन गटात रंगणारी आरोप प्रत्यारोपाची मजा काही वेगळीच होती.
सकाळी १२ वाजल्यापासून माशेल-देऊळवाडा येथील व इतर मंडळींचा सहभाग असलेल्या चिखलकाला-गोपाळकाल्याला सुरवात झाली.
किमान तीन-चार शतकांचा इतिहास या उत्सवाला असून त्यात लोकगीते, पारंपरिक खेळ, नाच-गाणी अशा विविध प्रकारांचा त्यात समावेश आहे.