Akshata Chhatre
गोव्यातील माशेल हे एक मोहक गाव आहे, जे आपल्या निसर्गसौंदर्याने, घनदाट हिरवाईने आणि शांत वातावरणाने प्रसिद्ध आहे.
या गावात दरवर्षी "चिखल कालो" नावाचा एक अनोखा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो
हा उत्सव गोव्याच्या शेतकरी समाजाच्या आणि आपली जीवनदायिनी असलेल्या भूमातेच्या नात्याला वंदन करण्यासाठी आयोजित केला जातो.
माशेल गावातील देवकी कृष्ण मंदिराच्या विशाल प्रांगणात हा धार्मिक उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यातील एकादशीला दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
पावसाळ्याच्या आगमनामुळे मंदिर परिसरात चिखलाचा सडा पसरतो आणि चिखलच या उत्सवाचा मुख्य भाग ठरतो.
उत्सवामध्ये रंगीबेरंगी नृत्यांसोबतच चेंडूफळी यासारखे पारंपरिक खेळ खेळले जातात.
चिखलामुळे खेळाडू वारंवार घसरतात, पडतात आणि चिखलाने माखून जातात आणि हाच या उत्सवाचा अनिवार्य भाग आहे.