Ganeshprasad Gogate
'पर्पल फेस्ट-2024'चे यजमानपद भूषविण्यास गोवा राज्य सज्ज झाले असून यंदापासून हा महोत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणून आयोजित केला जात आहे.
8 ते 13 जानेवारी दरम्यान हा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट महोत्सव होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सजावटीत कारागीर गुंतल्याचे चित्र राजधानीत दिसत आहे.
भारतासह विविध देशांतील आठ हजारहून अधिक प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पर्पल फेस्टच्या तयारीच्या मेळाव्यात एक हजारहून अधिक स्वयंसेवकांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मार्गदर्शन केले.
या महोत्सवाच्या माध्यमातून गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठीचा कणा उपचार केंद्र आणि दिव्यांगांसाठीच्या उपकरणाच्या युनिटचा प्रारंभ होणार आहे.