Ganeshprasad Gogate
खजूर म्हणजे एक प्रकारची खारीकच. चांगली पिकलेली खारीक शेवटी काळी गोड व नरम खजूर बनते.
वजन वाढण्यासाठी खजुराचा चांगला उपयोग होतो. खजूर हा शक्तीदायक मेवा आहे.
अधिक भूक लागणे, खोकला येणे, दमा, मूर्च्छा यांसारख्या विकारांवर व दारूमुळे झालेल्या रोगांवर खजूर - लाभदायक ठरतो.
खजुराच्या झाडापासून काढण्यात येणारी नीराही फारच गुणकारी पेय आहे. नीरा शक्तीवर्धक आहे.
ताजा खजूर खाणे सर्वात उत्तम. त्यावेळी आपली पचनशक्तीही चांगली असते. शक्तीत भर पडते आणि उत्साह वाढतो.
क्षय झाला असता कफाबरोबर जेव्हा रक्त पडू लागते तेव्हा खजूर खावा त्यामुळे रक्त पडण्याला आळा घातला जातो.