Manish Jadhav
गोव्याचं मोहीनी घालणारं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला मनमोहीत करतं. तुम्ही एकदा तरी गोव्याला नक्की भेट दिली पाहिजे.
तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये इथली प्राचीन मंदिरं नक्की पाहिली पाहिजेत. गोवनं संस्कृतीचं विलोभनीय दर्शन इथं घडतं.
आज (1 ऑक्टोबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिराबद्दल जाणून घेणारोत.
गोव्यात महालक्ष्मीची अनेक मंदिरे आहेत. यामध्ये मग पणजी येथील महालक्ष्मी मंदिर, बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर, नेत्रावळीचे महालक्ष्मी मंदिर, कोलवा येथील महालक्ष्मी मंदिर, शिरसई येथील महालक्ष्मी मंदिर इत्यादी.
प्राचीन काळात गोव्यावर राज्य करणाऱ्या शिलाहारांच्या दक्षिण कोकण (Konkan) शिलाहार आणि उत्तर कोकण शिलाहार अशा दोन शाखा होत्या.
शिलाहार हे महालक्ष्मीचे उपासक होते. नेत्रावळी येथील महालक्ष्मी मंदिर, कोलव्याचे महालक्ष्मी मंदिर आणि बांदोडाचे महालक्ष्मी मंदिर ही तिन्ही मंदिरे बहुधा दक्षिण कोकण शिलाहार युगातील आहेत.