Manish Jadhav
गोवा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर लगेच इथलं खुणावणारं निसर्ग सौंदर्य तरळून जातं.
गोवा सध्याच्या घडीला पर्यटकांची दुनिया बनलंय. गोव्याला दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात.
गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे.
गोवा हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक हे राज्य, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
गोव्याला अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभला असून गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो.
गोव्यात गणेशोत्सव, शिगमो, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. यावरुन दिसून येते की, गोव्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.
गोव्याला 3,702 किमी एवढे क्षेत्रफळ लाभले आहे.
कोकणी आणि मराठी या गोव्याच्या प्रमुख भाषा असून शेती आणि मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत.
गोव्यात प्रामुख्याने तांदूळ आणि कडधान्ये पिकवले जातात.
गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.