Sameer Amunekar
गोव्यात नारळाची झाडं भरपूर प्रमाणात आढळतात आणि ती राज्याच्या संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहेत.
गोव्यातील सागरी किनारे, नद्यांच्या काठावर आणि गावांमध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणावर दिसतात.
नारळ हे गोव्यातील कृषी उत्पादनांपैकी एक महत्त्वाचे उत्पादन असून त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो.
गोव्यातील सण, पूजाविधी आणि पारंपरिक पदार्थांमध्ये नारळाला विशेष स्थान आहे.
जमिनीची कमी उपलब्धता, हवामान बदलाचे परिणाम हे येथील नारळशेतीसमोरील आव्हाने आहेत.
गोवा हे निसर्गसौंदर्याने नटलेलं एक स्वर्गसमान ठिकाण आहे, आणि त्याच्या किनाऱ्यावर झुलणाऱ्या नारळाच्या झाडांनी या सौंदर्यात अधिक भर घातली आहे.