Sameer Amunekar
दररोज ध्यान केल्याने मन शांत होते. प्राणायाम तणाव कमी करण्यात मदत करते. नियमित योगासन केल्याने शरीर व मन दोन्ही ताजेतवाने राहतात.
चालणे, धावणे, सायकलिंग, किंवा कोणताही शारीरिक व्यायाम केल्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतो. शरीरात एंडॉर्फिन वाढतो, ज्यामुळे मन आनंदी राहते.
तणावग्रस्त विचारांऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही समस्येकडे संधी म्हणून बघण्याचा प्रयत्न करा. आभार मानण्याची सवय लावा, त्यामुळे जीवनातील सकारात्मकता वाढते.
भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, आणि पाणी सेवन करा. कैफिन आणि जास्त साखर असलेले पदार्थ कमी करा. जीवनसत्त्व बी आणि मॅग्नेशियमयुक्त आहार घेतल्याने तणाव कमी होतो.
रोज ७-८ तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी मोबाइल, टीव्ही किंवा कोणतेही स्क्रीन पाहणे टाळा. झोपण्याआधी हलकी पुस्तके वाचा किंवा सौम्य संगीत ऐका.
आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करा. काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन राखा. गरजेप्रमाणे ब्रेक घ्या आणि स्वतःला वेळ द्या.