Pramod Yadav
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, गोव्यात देखील भाजप, काँग्रेस आणि आरजी जोरदार प्रचार करत आहेत.
दक्षिणेत भाजपने यावेळी महिला उमेदवार दिल्याने पक्ष सध्या दक्षिणेत जास्त लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.
भाजपने उत्तर एक लाख आणि दक्षिणेत 60 हजार मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे.
मात्र, भाजपपुढे इंडिया आघाडी आणि आरजीच्या उमेदवारांचे आव्हान असणार आहे.
काँग्रेसने यावेळी खलप आणि विरियातो यांना उमेदवारी दिल्याने भाजपला दोन्ही जिल्ह्यात जोर लावावा लागणार आहे.
राज्यातील एसटी समाजाचे आणि भंडारी समाजाचे नेते नाराज असल्याने याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
याशिवाय म्हादई, राज्यातील अपघात, गुन्हे, रोजगार अशा मुद्यांवर आरजी आणि काँग्रेसचे उमेदवार आवाज उठवताना दिसत आहेत.