Pramod Yadav
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सपत्नीक साखळीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
आरजीपीचे अध्यक्ष आणि उत्तर गोवा उमेदवार मनोज परब यांनी देखील सकाळी मतदान केले.
काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी केले मतदान.
भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क.
रमाकांत खलप उत्तर गोव्याचे उमेदवार असून, त्यांची थेट लढत विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्याशी आहे.
पल्लवी धेंपे यांच्यासाठी भाजपने दक्षिणेत जोर लावला असून, सर्वांचे लक्ष दक्षिणते लागले आहे.
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
विजय सरदेसाई यांनी सपत्नीक मतदान केले, मुले, नातवंडे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी मतदान केल्याचे सरदेसाई म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सपत्नीक मतदान केले, NDA सहज चारशे पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सपत्नीक दोना पाऊला येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सपत्नीक केले मतदान.