Pramod Yadav
श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांची म्हापसा येथे सभा झाली.काँग्रेसवर टीका
या सभेत शहांनी काँग्रेसवर टीका करताना गोव्यासह देश पातळीवरील महत्वाच्या मुद्यांना हात घातला.
गोव्यातील बंद पडलेला खाणव्यवसाय येत्या दोन वर्षांत पूर्वीप्रमाणेच पूर्ण क्षमतेने सुरू झालेला दिसेल, असे शहा म्हणाले.
काँग्रेसवाले लहान राज्यांना महत्त्व देत नाहीत त्यामुळे राज्यातून भारत जोडो यात्रा गेली नाही, आरोप शहांनी केला.
काश्मीरसाठी ‘गोवा का बच्चा बच्चा जान देने के लिए तैयार है’, असे कलम 370 चा संदर्भ देताना शहा म्हणाले.
४ जूननंतर काँग्रेसला ‘काँग्रेस जोडो’ऐवजी ‘काँग्रेस ढूंढो’ यात्रा काढावी लागेल, असा टोलाही शहांनी लगावला.
गोवा भारतमातेच्या कपाळावरील बिंदी आहे, सर्वच क्षेत्रात राज्याने प्रगती केली आहे.