Ganeshprasad Gogate
आर्थिक अडचणीत अनेकजण कर्जाचा पर्याय निवडतात. झटपट कर्ज देणाऱ्या बँका किंवा खासगी वित्तीय संस्थांना संपर्क करतात.
तुम्हाला अधिक रक्कम दीर्घकाळ भरावी लागणार आहे. नीट माहिती न घेता घाईघाईत कर्ज काढल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्ज काढण्याआधी काही गोष्टींची शहानिशा करून घेतली पाहिजे.
मासिक मिळकत किती आहे, घरखर्च आणि इतर गोष्टींसाठी किती पैसे लागतात आदी गोष्टींची आधी पडताळणी करा. मगच किती कर्ज काढायचे निश्चित करा.
कर्जाची मुदत लहान असू द्या, दीर्घ मुदत कर्जात व्याजापोटी अधिक नुकसान होत.
कर्ज करारावर काही माहिती क्लिष्ट स्वरुपात असू शकते. यातील काही बाबी समजल्या नसतील तर विचारून घ्या. ही माहिती नीट वाचून घ्या.
कर्ज काढणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर ताण येऊ शकतो. त्यामुळे कर्ज काढताना त्याचा विमाही काढा. संकटकाळात कर्जाची फेड विमा कंपनी करते.