Ganeshprasad Gogate
कुमारिकांच्या मासिक पाळीच्या त्रासामध्ये अत्यंत उपयोगी ठरते म्हणून आयुर्वेदामध्ये कोरफडीला घृतकुमारी हे नाव आहे.
त्वचेच्या विकारांवर व सौंदर्यवर्धनासाठी कोरफड उत्तम आहे.
कोरफडीच्या वाळलेल्या रसाचे चूर्ण, हळद पावडर , चंदन पावडर, आवळा पावडर आणि सारीवा चूर्ण समभाग एकत्र करून वस्त्रगाळ पूड करावी. हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा चेहऱ्यास चोळून जिरवावे. चेहऱ्यावरील मुरूम, इतर त्वचाविचार नाहीसे होतात
भाजले असताना कोरफडीचा रस बाहेरून लावावा. टाच दुखत असताना कोरफडीचा गर आणि हळद यांचा गरम लेप टाचेवर लावून वर पट्टी बांधावी.
कोरफडमध्ये पॉलिसेकेराइड्स असतात, जे जटिल शर्करा असतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात.