Ganeshprasad Gogate
खैर वृक्ष मध्यम आकाराचा असून भारतात सर्वत्र आढळतो. अगदी सुपीक माती पासून तो अगदी खडकाळ माळरानातही रुजतो
ह्याचे किंचीत पिवळ्या रंगाचे फुलबाजी तुरे झाडभर असतात. तर फळं म्हणजेच शेंगा तपकीरी रंगाच्या चपट्या आकाराच्या असतात.
उन्हाळ्यात खैराची पाने गळतात आणि पावसाळ्यात नवी पालवी आणि फुले दिसू लागतात.
ह्याचे किंचीत पिवळ्या रंगाचे फुलबाजी तुरे झाडभर असतात. तर फळं म्हणजेच शेंगा तपकीरी रंगाच्या चपट्या आकाराच्या असतात.
खैराचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. घर बांधायला, तलवारीची मूठ बनवायला, उसाचा रस काढण्याच्या भांड्यासाठी हे लाकूड वापरलं जातं