Manish Jadhav
मनाला भावणारी गोव्याची निसर्ग किमया पर्यटकांना मनमोहीत करते.
तुम्ही या महिन्यात ( नोव्हेंबर) गोवा ट्रीप प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हा महिना पर्वणी ठरणार आहे.
गोव्यात नोव्हेंबर महिना फेस्टिव्हल महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात तुम्हाला फेस्टिव्हलची नांदी पाहायला मिळते.
तुम्ही सिनेरसिक असाल तर उद्यापासून (20 नोव्हेंबर) गोव्यात सुरु होणाऱ्या इफ्फी महोत्सवाचा नक्की आनंद लुटला पाहिजे.
इफ्फी महोत्सवात स्थानिक प्रतिभा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे 14 चित्रपट दाखवले जाणार आहेत. या माध्यमातून तुम्हाला गोवन संस्कृतीचं दर्शन घडेल.
इफ्फी महोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने पार पडावा आणि सर्व लोकांना त्यात सहभागी होणे सहज सुलभ व्हावे या उद्देशाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.