Goa IFFI 2024 ची खास आकर्षणे जाणून घेतलीत का?

Akshata Chhatre

जय्यत तयारी

20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या चित्रपट महोत्सवाची सध्या गोव्यात जय्यत तयारी सुरू आहे.

कामाने पकडला जोर

गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याच्या कामाने जोर पकडला आहे.

इफ्फीचे उद्घाटन

यंदा गोव्यात इफ्फीचे उद्घाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाने होणार आहे.

रोड परेड

यंदा इफ्फीच्या निमित्ताने ईएसजी ते कला अकादमी पणजी पर्यंत रोड परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. 

इफ्फी बद्दलचे कुतूहल

एकूणच शिग्मा आणि कार्निवल यांचा परेड किंवा ठिकठिकाणी होणाऱ्या चित्रपटांच्या स्क्रीनिंगमुळे चित्रपट प्रेमींमध्ये इफ्फी बद्दलचे कुतूहल आणखीनच वाढले आहे. 

स्क्रीनिंग

यंदाच्या वर्षी इफ्फीमध्ये दोन थिएटरमध्ये सहा अतिरिक्त स्क्रीनद्वारे चित्रपटांचे स्क्रीनिंग केले जाईल.

डिजिटल कंटेट क्रिएटर्सना संधी

ईफ्फीच्या संपूर्ण कालखंडात पहिल्यांदाच डिजिटल कंटेट क्रिएटर्सना या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

आणखीन बघा