Ganeshprasad Gogate
मध शरीराला भरपूर उर्जा प्रदान करण्यास मदत करते. मध आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्यापासून बचाव करण्यासोबतच ती मजबूत बनवू शकते.
हिवाळ्यात साजूक तूपाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक व लाभदायक असते. तूप आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते.
गुळात भरपूर प्रमाणात कॅलरी असतात. गोड पदार्थ व कॅफिनयुक्त पेयांमध्ये गुळाचा वापर करुन त्याचे सेवन केले जाऊ शकते. थंडीच्या दिवसांत साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो.
हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी घातल्यास शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
एक कप दुधात ४ ते ५ केसरच्या कांड्या उकळून प्यायल्याने सर्दीपासून सुटका होते. तसंच केसर त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.
तिळाचा वापर चिक्की व इतर हिवाळ्यातील मिठाईंमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो. तिळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात.