Ganeshprasad Gogate
तुळशीच्या पानात अनेक असाध्य रोग बरे करण्याची ताकद आहे
तुळशीच्या पानात कॅन्सर, हृदयरोग, किडनीचे विकार आणि त्वचारोग बरे करण्याची अपूर्व अशी शक्ती आहे.
तुळशीमध्ये शरीर शुद्ध करण्याची विजातीय किटाणूंचा नाश करण्याची अद्भूत शक्ती आहे. ताप हटविणे आणि खोकल्याचा जोर कमी करणे हे काम तुळशीने तत्काळ होते.
पेप्सिक अल्सर, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस आणि दमा या व्याधींवर तुळस अत्यंत गुणकारी आहे.
मानसिक ताण कमी होण्यास मदत
तुळशीत मानसिक ताण कमी करण्याचा गुण आहे. तुळशीचा चहा प्याल्याने अथवा तुळशीची ताजी पाने चावून खाल्यामुळे रोजच्या आयुष्यात येणारा मानसिक ताण कमी होतो आणि निरोगी आयुष्याकडे शरीराचा कल वाढतो.
मलेरियाच्या तापात तुळशीचा बहुमोल उपयोग होतो. तुळस, मिरी आणि गूळ यांच्या काढ्यात लिंबू पिळावे आणि गरम गरम असतानाच रुग्णास कपभर पाजावा. या काढ्याने घाम सुटून मलेरियाचा ताप निश्चितच उतरतो.