Ganeshprasad Gogate
यात कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो.
अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे.
टोमॅटोमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज टोमॅटो नियमितपणे खावा.
रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
टोमॅटोच्या 1 कप रसामध्ये 1000 इ.यु. 'अ' जीवनसत्त्व असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटो उपयोगी ठरतो
टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते.