Ganeshprasad Gogate
तरुण वयातच पांढऱ्या केसांच्या समस्या सुरु होते. अशावेळी तुरटीची बारीक पूड करून तेलामध्ये तेल कोमट करून मिसळावी व डोक्याला मसाज करावा. हळूहळू पांढऱ्या केसांची समस्या कमी झालेली दिसेल.
एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ व एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करावे. हे पाणी गार झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्यास दातावरील किड कमी होते.
बऱ्याच जणांना मांसपेशी आखडण्याची समस्या भेडसावीत असते. अशावेळी तुरटी आणि हळदीची पूड एकत्र करून आखडलेल्या मांसपेशीवर लावल्यास आराम मिळतो.
तुरटीची पूड करून त्यात थोडे गुलाबजल टाकून, त्याची दाटसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा धुवून त्यावर लावावी. १०-१५ मिनिटे ठेवून मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. चेहरा काही दिवसात उजळेल.
बऱ्याच जणांचे पाय काळवंडलेले आणि त्यावरील त्वचा फाटलेली असते. अशावेळी कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास पायांच्या त्वचेमध्ये चांगलाच फरक झालेला दिसून येतो.