Ganeshprasad Gogate
रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असावे.
रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.
रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे.
पचनाशी निगडित समस्या-
रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात.
शरीरातील ऊर्जा कमी होणे-
रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.