Ganeshprasad Gogate
जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल तर ती कमी होण्यास गाजराचा ज्युस मदत करतो
गाजरांमध्ये जीवनसत्त्वे A, C, K, B8, झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.
गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर खूप चमक येते.
गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते.
यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.
गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. हे तुम्हाला तणाव आणि चिंतामुक्त ठेवते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो.