Ganeshprasad Gogate
राज्यात गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत टीबी बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे.
2019 ते 2023 दरम्यान राज्यात टीबीमुळे 598 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यात 185महिला तर 413 पुरुषांचा समावेश आहे.
वाढत्या मृतांचा आकडा रोखण्यासाठी राष्ट्रीय टीबीनिर्मूलन कार्यक्रमांतर्गत गोव्याला केंद्र सरकारकडून 12 कोटी 21 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
गोव्याला देण्यात आलेल्या एकूण 12 कोटी 21 लाख रुपयांमध्ये यातील सर्वाधिक 3 कोटी 93 लाख रुपये 2021-22 यावर्षी देण्यात आले आहेत.