Pramod Yadav
अयोध्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट खाली नवा आदेश जारी केला असून, राज्यातील शाळा बंद राहतील.
सर्व बँका बंद राहतील.
तसेच, सरकारी खाती व इतर आस्थापनांना सुट्टी देण्यात जाहीर करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीत मांस विक्रीला बंदी घातली आहे.
दरम्यान, राज्यातील खासगी आस्थापने नियमित सुरु राहणार आहेत.
केंद्र सरकारने सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.