गोमन्तक डिजिटल टीम
काणकोणात सामुदायिक श्रीगणेश व नवधान्य पूजनाची गेल्या अनेक दशकांची परंपरा आहे.
भगत लोकांची ही परंपरा आजच्या युवा पिढीनेही पुढे चालवली आहे.
सर्व भगत कुटुंबीय मठात एकत्र येऊन श्रीगणेश पूजन करतात.
चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी कुटुंब प्रमुख शेतात जाऊन कणसे आलेल्या भाताची रोपे कापून मठात आणतात.
धान्य मठात आणून प्रत्येक कुटुंब प्रमुख नवधान्य, आंब्यांची पाने, तेरडा यांची गुंफण करून ती केवणीच्या काठीला बांधतो
त्यानंतर पूजा करून नव धान्याचे तोरण आपआपल्या घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर लावतात.
समृद्ध वारसा, चालीरिती आणि परंपरांचा सन्मान करणारा हा नवधान्य पूजन उत्सव आहे.