Pramod Yadav
गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून (०६ फेब्रुवारी) सुरुवात झाली.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सरकारी मानवंदना स्वीकारून मुख्यमंत्री सावंत आणि विरोधी पक्षनेते आलेमाव यांच्यासह सभागृहात प्रवेश केला.
राज्यपाल पिल्लई यांनी यांनी राष्ट्रगीतानंतर अभिभाषणाला सुरुवात केली पण, यापूर्वीच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.
राज्यपालांचे अभिभाषण सुरु असताना फातोर्डाचे आमदार निषेध बॅनर घेऊन उभे होते.
आमदार सरदेसाईंनी कॅश फॉर जॉब स्कॅमबाबत बॅनर हातात घेऊन निषेध नोंदवला.
राज्यपालांचे अभिभाषण सुरु असताना देखील सरदेसाई हातात बॅनर घेऊन उभेच राहिलेले दिसले.