Pramod Yadav
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री श्रिया पिळगावकरचे गोव्यातील फोटो समोर आले आहेत.
श्रिया तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नानिमित्त गोव्यात आली असता तिने केलेले फोटोशूट Instagram वर शेअर केले आहे.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रिया पिळगावकर खुलून दिसत आहे.
मूळ गोव्याची असणाऱ्या श्रियाने मराठीसह हिंदी चित्रपटांत काम केले आहे.
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकरांची लेक असणाऱ्या श्रियाने फॅन चित्रपटात शाहरुखसोबत देखील काम केलंय.
श्रियाचे गोव्यातील फोटो सध्या तिच्या चाहत्यांना चांगलेच पसंद पडले आहेत.
श्रियाच्या या पोस्टला ३७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.