Ganeshprasad Gogate
केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने गोवा सरकारला पाठवलेल्या पत्रानुसार, गोव्यातील खासगी वनक्षेत्रातील घरांच्या मालकांना निवासी इमारती बांधण्याची परवानगी दिली आहे.
घराजवळ लावलेल्या झाडांची नोंद 'खासगी वनक्षेत्र' म्हणून झाली असेल तर आता त्या जागी राहते घर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवाय असलेल्या घरांचाही 250 चौरस मीटरपर्यंत विस्तार करता येणार आहे.
मात्र कोणत्याही संस्थात्मक इमारती किंवा व्यावसायिक विकासासाठी बांधकामाचा वापर करता येणार नाही.
खासगी जंगलात निवासी इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यात आहे.
11 फेब्रुवारी 2011 पूर्वी त्याजागी निवास करणारेच या सवलतीस पात्र ठरतील.