Sameer Panditrao
गोव्याच्या पारंपरिक कुणबी वस्त्राला आधुनिक व्यासपीठावर नवी ओळख मिळाली.
गोवा वन विविधता महोत्सवात कुणबी वस्त्राचा खास फॅशन शो आयोजित करण्यात आला.
सिद्ध फॅशन डिझायनर वेर्मा डिमेलो यांनी कुणबी वस्त्राला आधुनिक स्पर्श दिला.
परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम या रचनांमध्ये दिसून आला.
रॅम्पवर सादर झालेल्या कुणबी पोशाखांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्रेक्षकांकडून या अभिनव फॅशन प्रयोगाला उत्स्फूर्त दाद मिळाली.
कुणबी वस्त्राला जागतिक फॅशनच्या नकाशावर स्थान मिळण्याची नवी शक्यता निर्माण झाली.