गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात सतत वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते. पणजीत नुकतीच ही आगळीवेगळी स्पर्धा पार पडली.
पणजीच्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स जेटीवर शेकडोच्या संख्येने स्त्री-पुरुष हातात गळ घेऊन उभे होते.
युनायटेड फ्रेंड्स ऑफ पणजी या संस्थेने आयोजित केलेली ही १७ वी मासेमारी स्पर्धा होती.
१७४ स्पर्धक कॅप्टन ऑफ पोर्ट्स जेटीवर मासेमारी करत होते.
सर्वात वजनदार मासा पकडणाऱ्याला या स्पर्धेत विजेतेपद दिले जाते.
अधिकाधिक संख्येने मासे पकडणाऱ्यासाठी देखील विशेष बक्षीस होते.
विशेष म्हणजे स्पर्धकांमध्ये १२ महिला आणि ५ मुलांचा समावेश होता.