Ganeshprasad Gogate
मासेमारी हा गोव्यातील एक महत्वाचा उद्योग असून समुद्री मासेमारी हा प्रकार गोव्यात मोठ्या प्रमाणावर चालतो.
तुम्ही जर ऑक्टोबर ते मे या कालावधीत गोव्यात आलात तर मिरामार. कळंगुट, बागा, हरमल, मांद्रे, शिवोली सारख्या किनारी भागात मासेमारी करणाऱ्या बोटी, मच्छीमार यांची रेलचेल असलेली पाहायला मिळेल.
मच्छीमारी करण्यासाठी कामगार 4-5 दिवसांसाठी लागणारे आवश्यक ते साहित्य घेऊन खोल समुद्रात जात असल्याचे चित्र आपल्याला नेहमीच या किनाऱ्यांवर दिसून येते.
बोटी, मच्छीमारांची जाळी, समुद्रात जाताना आवश्यक असणारी भांडी असे सर्व साहित्य या किनाऱ्यावर झोपड्या करून मांडून ठेवलेले आपल्याला दिसून येईल.
या किनाऱ्यांवर पकडून आणलेली मासळी निवडली जाते. त्यातील लहान-मोठे मासे वेगळे केले जातात आणि ते निर्यातीसाठी बर्फाच्या क्रेटमध्ये भरले जातात.
मोठमोठ्या क्रेट्समध्ये भरलेली मासळी निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरून पाठवली जाते