Sameer Amunekar
कोला बीच हा गोव्याच्या दक्षिण भागातील एक गुपित ठेवलेला नयनरम्य समुद्रकिनारा आहे. हा बीच काणकोण तालुक्यात स्थित असून, आपल्या स्वच्छ निळसर पाण्यासाठी आणि शांततेसाठी हा किनारा प्रसिद्ध आहे.
किनाऱ्यावर नैसर्गिक सावली देणारी उंच नारळाची झाडे, जी वाऱ्याच्या झुळकीसोबत हलताना सुंदर दृश्य निर्माण करतात.
शांतता आणि गर्दीपासून दूर राहायचं असेल तर हा बीच बेस्ट आहे. लोकप्रिय बीचच्या तुलनेत इथे खूपच कमी पर्यटक येतात त्यामुळे शांतता असते.
किनाऱ्यावर पसरलेली सोनेरी वाळू, उंचच उंच नारळाची झाडे आणि पार्श्वभूमीला डोंगरांनी वेढलेले हे ठिकाण स्वर्गासारखे भासते.
कोला बीचवर एक सुंदर गोड्या पाण्याचे नैसर्गिक लॅगून (Lagoon) आहे, जे इथल्या सौंदर्यात भर घालते. समुद्राच्या अगदी जवळ असलेले हे लॅगून पोहण्यासाठी, कयाकिंगसाठी आणि आराम करण्यासाठी उत्तम आहे.
कोला बीच इतर लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांसारखा पर्यटकांनी भरलेला नाही. त्यामुळे येथे शांतता प्रचंड असते. हे ठिकाण मुख्यतः आराम आणि निसर्गाचा आस्वाद घेणाऱ्या पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.