गोमन्तक डिजिटल टीम
काणकोणात गोठ्यातील गुरांना आंघोळ घालून त्यांच्या गळ्यात नवे दावे, झेंडूच्या फुलांच्या माळा, पोह्यांची पुरचुंडी, खोबरे तसेच अंगावर रंगोटी करून त्यांना माळरानावर सोडण्यात आले.
माळरानावरील पारंपरिक जागेत बसून पोळे आणि चटणीचा आस्वाद घेण्याची पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा मयेतील शेतकऱ्यांनी आजही टिकवून ठेवली आहे.
बोरी गावात दिवाळी पाडव्यानिमित्त पारंपरिक धेंडलो उत्सव साजरा करण्यात आला. पाडव्यानिमित्त शेतकरीवर्गाने आपल्या गुरांना आंघोळ घालून पूजा केली व खायला पोळा दिला.
करमळी येथील श्री गोपाळकृष्ण देवस्थानच्या धेंडलोत्सवात सहभागी झालेले भाविक.
माशेल येथील श्री देवकीकृष्ण संस्थानतर्फे धेंडलोत्सव साजरा करताना भाविक.
सावईवेरे येथे ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’ अशी पारंपरिक लोकगीते गाऊन ढोल-ताशांच्या निनादात धेंडलो उत्सव झाला.
दीपावलीच्या मंगलप्रसंगी विठ्ठलापूर-साखळी येथील श्री पांडुरंग देवस्थानात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला.