Akshata Chhatre
व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा उत्सव. पण त्यासाठी खूप खर्च करावा लागतो असं नाही! चला, गोव्यात बजेटमध्ये रोमँटिक डे कसा साजरा करायचा ते पाहुया!
गोव्यातील सुंदर किनारे कायम आहेतच. बीचवर सूर्यास्त पाहायला जा. शांत वातावरणात पिकनिक करा आणि एकमेकांसोबत वेळ घालवा.
गोव्यातील चविष्ट आणि किफायतशीर रेस्टॉरंट्समध्ये रोमँटिक जेवण करा. स्थानिक खाण्याचा अनुभव घ्या.
गोव्यातील शांत समुद्रात बोट सफारी करा. उत्तम वाजवी दरात सफारी मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा व्हॅलेंटाईन डे खास होईल.
गोव्यातील ऐतिहासिक स्थळे, चर्चेस आणि किल्ले एक्सप्लोर करा. एकमेकांबरोबर गोव्यातील सांस्कृतिक ठिकाणांवर वॉक करा, आणि तिथे असलेल्या सुंदर लँडस्केप्सचा आनंद घ्या.
जास्त खर्च न करता, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत गोव्यात रोमँटिक, शांत आणि सुंदर वेळ घालू शकता.