Manish Jadhav
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक नवख्या खेळाडूंची किस्मत चमकली. 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी करोडपती झाला. दुसरीकडे मात्र गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली.
गोव्याचा अष्टपैलू खेळाडू सुयश प्रभुदेसाई यंदाच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला.
सुयशने आपल्या घातक अष्टपैलू खेळीच्या जोरावर गोव्याला अनेक सामने जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्येही त्याने आपला जलवा दाखवून दिलाय.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू सुयश गोव्याचं प्रतिनिधीत्व करतो. सुयशने आतापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामने, 47 लिस्ट ए सामने आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत.
रेड बॉल क्रिकेटमध्ये सुयशने अफलातून कामगिरी केली आहे. त्याने 11 बळी घेण्यासोबतच 6 ताबडतोब शतके आणि 14 अर्धशतके ठोकली आहेत.
सुयशने लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने एक शतक आणि 7 अर्धशतकांसह 1190 धावा केल्या आहेत तर टी-20 मध्ये त्याने चार अर्धशतकांच्या मदतीने 949 धावा केल्या आहेत.
सुयशने 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो या हंगामात 5 खेळला होता, मात्र IPL 2024 मध्ये सुयश केवळ एकच सामना खेळू शकला.