Ganeshprasad Gogate
मोत्यांची निर्मिती प्रामुख्याने पिंक्टाडा जातीतील कालवांत होते.
मोती कालवं समुद्रात 18 ते 22 मीटर खोलीवर खडकाळ रेताड भागात किंवा मृत प्रवाळांना चिकटलेली आढळतात.
पूर्ण गोल, आकर्षक रंगाचे चमकदार व जड मोती हे उत्तम प्रतीचे समजले जातात.
मोती तयार होताना शिंपले जर पाण्याच्या बाहेर फेकले गेले तर योग्य पोषणाअभावी मोत्यांचे आकार ओबडधोबड होतात.
नैसर्गिक प्रक्रियेतून मिळणाऱ्या मोत्यांचे प्रमाण फार कमी असल्याने कृत्रिमरीत्या मोती संवर्धन केले जाते.
मोती संवर्धनाद्वारे ग्रामीण युवकांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.