Ganeshprasad Gogate
सध्या गोव्यात थंडी जाणवू लागलीय. थंडीमध्ये श्वसनाचे आजार वाढतात. त्यामुळे प्रत्येकाने श्वासोच्छवासाबद्दल काळजी घेणे खूप गरजेचं आहे.
यामध्ये उबदार कपडे घालणे, थंडीपासून संरक्षण करणे तसेच या काळात शक्यतो धूळग्रस्त जी ठिकाणं आहेत किंवा जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.
कोरोनामध्ये सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणं जाणवतात.
या लक्षणांची तीव्रता जाणवल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
जर तुमची ऑक्सिजन लेव्हल कमी असेल किंवा श्वास घ्यायला जास्त त्रास होत असेल तर यावर वेळीच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्या.