Ganeshprasad Gogate
गुळामध्ये काळी मिरीचे थोडेसे चूर्ण टाकून हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घेतल्यास सर्दी-ताप ठीक होईल.
मोहरीचे तेल थोडेसे गरम करून छाती, पायांचे तळवे आणि नाकाला लावल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल.
दीड चमचा बडीशेपची वाफ घ्यावी. त्यानंतर थोडे पाणी प्यावे. त्यानंतर लगेच गरम दुध प्यावे. या उपायाने सर्दीमध्ये आराम मिळेल.
निलगिरीची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळेल
हळद आणि सुंठ चूर्णाचा लेप कपाळाला लावल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.
नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवावं.