Pramod Yadav
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासोबत अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री सावंत रामलल्लाच्या चरणी नतमस्तक होत गोवा आणि गोमन्तकीयांसाठी सुखाची मागणी केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातील सहकारी पक्षाचे आमदार आणि नेते यांच्यासह अयोध्येला भेट दिली.
मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.
विमानतळावरुन मुख्यमंत्री, त्यांची पत्नी सर्व सहकारी रामलल्ला दर्शनासाठी अयोध्या येथील मंदिराकडे रवाना झाले.
दोनच दिवसांपूर्वी गोव्यातून 2000 भाविकांना आस्था या विशेष ट्रेनद्वारे अयोध्येला रवाना करण्यात आले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तसेच, गोवा आणि गोमन्तकीयांसाठी सुख, समृद्धीची मागणी केली.