Ganeshprasad Gogate
सध्या सर्वत्र लोक सभा निवडणुकीचे वेध सुरु झाले असून गोव्यात यंदाही भाजप सरकार सत्तेत येण्यासाठी सर्व मंत्री आपली ताकद पणाला लावत आहेत.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीतील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींचे मंदिरात पूजा केली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर आणि मुख्य पुजारी व डॉ चैतन्य घनवटकर उपस्थित होते.
मोदी सरकार सत्तेत येऊ दे, पूर्ण भारत देशातील जनता सुखी समाधानी होऊदे यासाठी सावंत यांनी केली श्रींचरणी प्रार्थना
श्रींची पूजा, अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर दिवार लेखन अभियान- कार्यक्रम सुद्धा पार पडला.
जनतेच्या सूचना रथयात्रेच्या माध्यमातून संकलित करत मतदार राखण्यासाठी भाजपचे नवे मिशन आरंभले असून मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते या मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून येतेय.