Pramod Yadav
आषाढी एकादशी निमित्त गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी विठुराला दुग्धाभिषेक घालत पूजा केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील म्हापसा येथील विठ्ठल मंदिरात विधीवत पूजा करत दर्शन घेतले.
मुख्यमंत्री सावंत यांनी सकाळी म्हापास येथे दाखल होत पूजा आटोपून अधिवेशनासाठी हजेरी लावली.
गोवा, महाराष्ट्रासह सर्वत्र आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राणे यांनी साखळीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात दुग्धाभिषेक करुन पूजा केली.
मंत्री विश्वजीत राणे यांनी आषाढी एकादशीनिमित्त सर्व गोमंतकीयांनी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत उपसभापती म्हापसाचे आमदार जोशुआ डिसुझा उपस्थित होते.