Pramod Yadav
गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस देखील एल्टन यांनी सभापतींची माफी मागवी याविषयावरुन गाजला.
एल्टन यांनी हक्कभंग समितीसमोर जाण्याची दर्शवलेल्या तयारीला विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील समर्थन दिले.
एल्टन यांनी सभापतींची नव्हे तर सभापती पदाची माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी लावून धरली.
सत्ताधारी पक्षातील सर्वच नेत्यांनी या मागणीला दुजोरा देत स्पष्टीकरण मिळत नाही तोवर कामकाज सुरु जाणार नाही अशी भूमिका घेतली.
माफीनामा आणि हक्कभंग यावरुन सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.
अखेरीस विजय सरदेसाई आणि युरी आलेमाव यांनी हा विषय विसरुन जावा आणि कामकाज सुरु करावी अशी मागणी केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरदेसाई आणि आलेमाव यांच्या मतांवर सहमती दाखवत हा विषय संपल्याचे स्पष्ट केले.
यानंतर लक्षवेधीच्या वेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कांदोळी येथील खून प्रकरणासह राज्यातील गुन्हे यावर लक्षवेधी मांडली,
यावरुन सत्ताधारी आमदारांसह विरोधी बाकावरील आमदारांनी सूचना केल्या, याला मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.