Sameer Amunekar
हिवाळ्यात टाळू कोरडी होऊन केस गळण्याची समस्या वाढते. नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह तेल हलके गरम करून 10 मिनिटे मसाज करा. रक्ताभिसरण वाढते आणि केसांची मुळे मजबूत होतात.
रात्री भिजवलेली मेथी सकाळी बारीक वाटून केसांच्या मुळांवर लावा. मेथीमधील प्रथिने व निकोटिनिक अॅसिड केस गळणे नियंत्रणात ठेवतात. आठवड्यातून 1-2 वेळा वापरा.
अॅलोवेरामध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असून ते टाळूला ओलावा देतात आणि कोंडा कमी करतात. थेट जेल टाळूवर लावून 30 मिनिटे ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवा.
कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्स केस गळणे कमी करतात. कढीपत्ते नारळ तेलात उकळवून तयार झालेले तेल टाळूवर लावले तर केसांची वाढ सुधारते.
कांद्याच्या रसात सल्फर मुबलक असते, जे केसांची वाढ सुधारते व गळती कमी करते. कांद्याचा रस टाळूवर 15–20 मिनिटे लावून नंतर शॅम्पू करा.
हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते. पालक, मेथी, गाजर, अंडी, कडधान्ये, सुकामेवा आहारात ठेवा. पुरेसं पाणी प्या. यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते.
हिवाळ्यात सल्फेट-पराबेन असलेले केमिकलयुक्त शॅम्पू केस अधिक कोरडे करतात. सौम्य हर्बल शॅम्पू वापरा आणि आठवड्यातून 2 वेळांपेक्षा जास्त शॅम्पू करू नका.