Sameer Amunekar
भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. दिल्लीत कर्तव्यपथावरील परेडमधून देशाच्या विविधतेमधील एकता, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि सैन्यदलाचं सामर्थ्य याचं भव्य प्रदर्शन जगाला पाहायला मिळत आहे.
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने गोव्याचा चित्ररथ दोन वर्षानंतर पहिल्यांदाच दिल्लीत पाहायला मिळाला. गेल्यावर्षी गोव्याचा चित्ररथ दिसणार होता, मात्र काही कारणामुळं तो रद्द करण्यात आला होता. यंदा मात्र गोव्याच्या चित्ररथाची झलक पाहायला मिळाली.
गोव्याचा चित्ररथ 'स्वर्णिम भारत: विरासत और विकास' या थीमवर आधारित होता.
चित्ररथामध्ये गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे आणि समृद्ध संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळालं.
गोव्याच्या सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करून दाखवणारी पवित्र दिवाजांची मिरवणूक या चित्ररथाचं प्रमुख आकर्षण होतं. याशिवाय गोव्याचा अद्वितीय संस्कृतीचं दर्शन घडवेल.
गोवा हा पर्यटनाशिवाय अपूर्ण असल्याने चित्ररथात पर्यटनाला देखील प्राधान्य देण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील गोव्याचा चित्ररथानं राज्याचा सांस्कृतिक वारसा आणि प्रगतीचं अप्रतिम प्रदर्शन घडवून आणेल.