Pramod Yadav
गोव्यात आल्यानंतर एकदातरी कॅसिनोत जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण, पैसे अधिक खर्च होतील या भीतीने अनेकजण टाळाटाळ करतात.
गोव्यात कॅसिनोमध्ये जाण्यासाठी किती खर्च येतो, कॅसिनोत गेल्यावर कोणत्या सुविधा मिळतात याची माहिती आपण घेणार आहोत.
गोव्यात दोन प्रकारचे कॅसिनो आहेत एक पाण्यावरचे आणि दुसरे जमिनीवर असणारे कॅसिनो.
पाण्यावरील कॅसिनोत जाण्यासाठी साधारण दोन हजार रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत प्रवेश फी आकारली जाते. तर, जमिनीवरील कॅसिनोत २ ते ३ हजार रुपयांपर्यंत प्रवेश फी असते.
या प्रवेश फीमध्ये कॅसिनोमध्ये प्रवेश आणि गेम्स खेळण्यासाठी काही रक्कमेचे कॉईन्स दिले जातात. यामध्ये तुम्हाला येथे गेम्स खेळता येतील.
याशिवाय कॅसिनोमध्ये गेल्यावर कॉम्पलीमेंटरी ड्रींक्स आणि खाद्यपदार्थ मिळतात. कपल्ससाठी कॅसिनो प्रवेश दर वेगळा असतो.
गोव्यात डेल्टीन रॉयाल, बिग डॅडी, कॅसिनो प्राईड, मॅजेस्टिक प्राईड यासारखे काही प्रसिद्ध कॅसिनो आहेत. गोव्यात २४ तास कॅसिनो खुले असतात.