Pramod Yadav
दक्षिण गोव्याची तहान भावणाऱ्या साळावली धरणाजवळ प्राचीन महादेव मंदिर आहे.
धरणाकडे जाताना उजव्या दिशेला असणाऱ्या एका बागेत हे महादेव मंदिर उभारण्यात आले आहे.
महादेव मंदिर यापूर्वी येथून 17 किलोमीटर लांब असलेल्या कुर्डी गावातील नेत्रावळी नदीजवळ होते.
साळावली धरणाच्या उभारणीवेळी स्थलांतरीत करण्यात आलेल्या गावांसोबत या मंदिराचे देखील स्थलांतर करण्यात आले.
धरणाच्या बांधणीवेळी पाण्याखाली येणारे कुर्डी गाव्यात हे महादेव मंदिर स्थित होते.
गाव स्थलांतर झाल्यानंतर त्याच्यासोबत मंदिराचे देखील स्थलांतर करण्यात आले.
मंदिराची खास गोष्ट म्हणजे यासाठी वापरण्यात आलेल्या प्रत्येक दगड जुन्याच मंदिराचा असून, त्याला नंबर देऊन पुन्हा उभारणी करण्यात आलीय.
पर्यटक दक्षिण गोव्यात साळावली धरणाला भेट देतात त्यावेळी त्यांना महादेव मंदिराला देखील भेट देण्याचा मोह होतो.