Sameer Panditrao
गोव्याच्या पारंपरिक शेतीतील एक महत्त्वाचा हंगाम म्हणजे काजू हंगाम! जानेवारीच्या शेवटापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत काजूच्या झाडांना मोहोर येतो.
सुरुवातीला झाडावर लहान हिरव्या काजूच्या बोंडांची वाढ होते. हळूहळू ती पिवळी, नारंगी किंवा लालसर रंगाची होतात.
गोव्यात काजूपासून फेणी, मसाला काजू यांसारखे विविध पदार्थ तयार केले जातात.
काजूच्या फळातील रस गाळून त्याचा आंबवून आसव तयार केला जातो, त्याला स्थानिक भाषेत "उर्राक" म्हणतात. त्याच्यावर प्रक्रिया करून प्रसिद्ध गोवा फेणी बनवली जाते.
काजू पिकले की त्यातील गर काढण्यासाठी प्रक्रिया केली जाते. हा हंगाम मार्च ते मे महिन्यापर्यंत सुरू राहतो.
सुकवलेल्या काजू बिया भाजून त्यावर प्रक्रिया करून स्वादिष्ट काजू मिळतात. त्यानंतर त्यांना मीठ, मिरपूड, मसाले लावून विविध प्रकारांमध्ये विकले जाते.
काजू हंगाम म्हणजे गोव्याच्या ग्रामीण भागातले चैतन्य! तुम्ही गोव्यात असाल, तर ताज्या काजू बियांपासून बनवलेले पदार्थ आणि फेणी नक्कीच चाखा.