Ganeshprasad Gogate
गोव्यात कार्निव्हल उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पर्यटन खात्याकडून पणजीनंतर, मडगावात व आज वास्कोत कार्निव्हलचे आयोजन केले होते.
खा, प्या आणि आनंदी राहा, या किंग मोमोच्या संदेशाने वास्को शहरात आज सोमवारी मोठ्या दिमाखात व्हिवा कार्निव्हल फ्लोट परेड झाली.
या वर्षीच्या कार्निव्हल थीममध्ये पर्यटन परंपरा आणि वारशाचा सन्मान करण्यावर भर देण्यात आला.
मिरवणूक सेंट अॅण्डू चर्च मार्गाने सुरू होऊन स्वतंत्र पथ मार्गाने मार्गक्रमण झाल्यानंतर रेल्वे स्थानकासमोर जोशी चौकात सांगता झाली.
रंगीबेरंगी आणि आकर्षित असे 60 चित्ररथांची मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.