Sameer Amunekar
गोव्यातील कार्निव्हल उत्सव 28 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाला आहे, ज्याची सांगता 4 मार्च 2025 रोजी होणार आहे.
कार्निव्हल उत्सवाच्या मिरवणुकीत अनेक नेते आणि सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात उपस्थितीत होते.
मराठी सिनेसृष्टीतील गोमंतकीय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची विशेष उपस्थितीत कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात झाली.
विविध विषयांवर आधारित, जनजागृती करणारे, संदेश देणारे चित्ररथ तसेच आकर्षक वेशभूषा केलेल्या कलाकारांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
गोवा कार्निव्हल हा राज्यातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये नेत्रदीपक परेड, संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद लुटता येतो.
कार्निव्हलमध्ये स्थानिक नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचीही उपस्थिती असते.