Pramod Yadav
गोव्यात दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देश आणि विदेशातील पर्यटकांना कार्निव्हलचे आकर्षण असते.
09 फेब्रुवारीपासून गोव्यात कार्निव्हलचा जल्लोष सुरु झाला आणि राज्यात किंक मोमोची राजवट लागू झाली.
पर्वरी येथे कर्टन रेजर कार्यक्रम पार पडल्यानंतर पांरपरिक पद्धतीने फ्लोट मिरवणूक काढण्यात आली.
उत्साह, संस्कृती दर्शन, वैविध्य आणि संगीताच्या तालावर निघणारी मिरवणूक अशा वातावरणात पर्वरीनंतर पणजीत मिरवणूक काढण्यात आली.
कार्निव्हलमध्ये गोव्यातील पांरपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध फ्लोट पाहायला मिळतात.
यासह यात कलात्मक पद्धतीने साकारण्यात आलेले मनमोहक फ्लोट देखील पाहायला मिळतात.
वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्निव्हल परेडमध्ये अध्यात्म, फॅशन, गोमन्तकीय संस्कृती, सामाजिक संदेश देणारे फ्लोट यांचा समावेश असतो.
कार्निव्हलचे औचित्य साधून राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजना आणि कामाची माहिती देणारे फ्लोट देखील असतात.
उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या गोव्यातील कार्निव्हल महोत्सवाचे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षण असते.